स्वामी कृपा कधी करणार (Swami Krupa Kadhi Karanar)
स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार
तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार ll धृ ll
तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार ll धृ ll
मी अपराधी पापी तापी अहंकार युत अन संतापी
दीन पतीत या तव बाळाला उरी कधी धरणार ll १ ll
दीन पतीत या तव बाळाला उरी कधी धरणार ll १ ll
मद मदनाची जोडी नामी व्यवहारी मन जडले कामी
अज्ञानाचा तिमिर हराया सूर्य कधी बनणार ll २ ll
अज्ञानाचा तिमिर हराया सूर्य कधी बनणार ll २ ll
स्वामी राया ,माझी काया आतुर झाली,तुम्हा पहाया
याया आता उशीर कासया दर्शन कधी देणार ll ३ ll
याया आता उशीर कासया दर्शन कधी देणार ll ३ ll
1 comments
जय श्रीस्वामी समर्थ 🚩
ReplyDelete