आवडीने भावे हरिनाम घेसी (AAVADINE BHAVE HARINAM GHESI) 17:27 Unknown 0 Comments Category : अभंग आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ || नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २ || सकळ जीवांचा करितो सांभाळ | तुज मोकलिल ऐसे नाही || ३ || जैसी स्थिती आहे तैशापरी राहे | कौतुक तू पाहे संचिताचे || ४ || एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा | हरिकृपे त्याचा नाश झाला || ५ || Unknown RELATED POSTS यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाच...माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला म...उस डोंगा परी रस नोहे डोंगा (Us Don... 0 comments
0 comments