झाला महार पंढरीनाथा (JHALA MAHAR PANDHARINATH)
झाला महार पंढरीनाथा | काय
सांगू देवाची मात ||
नेसला मलीन चीघोटी | घेतला
हातामधे काठी ||
घोंगडी टाकिली पाठी | करी
जोहार दरबारात || १ ||
मुंडाशात बांधिली चिठ्ठी |
फेकीतो दुरुनी जगजेठी ||
दामाजीने विकली जी कोठी |
त्यांचे दाम घ्यावे पदरात || २ ||
खळखळा ओतिला मोहरा | त्याची
मोजून पावती करा ||
ढीग बघून चमकल्या नजरा |
शहा घाली बोट तोंडात || ३ ||
0 comments