Harmony Clean Flat Responsive WordPress Blog Theme

स्वामी कृपा कधी करणार (Swami Krupa Kadhi Karanar)

11:07 Unknown 0 Comments Category : ,


स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार 
तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार ll धृ ll 

मी अपराधी पापी तापी अहंकार युत अन संतापी 
दीन पतीत या तव बाळाला उरी कधी धरणार ll १ ll


मद मदनाची जोडी नामी व्यवहारी मन जडले कामी
अज्ञानाचा तिमिर हराया सूर्य कधी बनणार ll २ ll

स्वामी राया ,माझी काया आतुर झाली,तुम्हा पहाया
याया आता उशीर कासया दर्शन कधी देणार ll ३ ll

RELATED POSTS

0 comments