सुंदर ते ध्यान पहा जाऊनी (SUNDAR TE DHYAN PAHA JAVUNI, BHAKT JAN SAMBHALITO VITE UBHA RAHONI)
सुंदर ते ध्यान पहा जाऊनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || धृ ||
कर ठेवुनी कटेवरी, उभा आहे विटेवरी
कानी कुंडल मकराकार, गळा शोभे
तुळशीहार
कौस्तुभ मनीविराज, कंठी दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || १ ||
विठू उभा ना बैसला, जिकडे तिकडे
दाटीयेला
चराचर व्यापून सारे, विटेवर उभा
राहिला
नेसला तो पितांबर दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || २ ||
सत्यानंद म्हणे विठ्ठला, डोळे भरुनी पहिले
तुजला
अंतर्भाह्य तोची भरला, कुठे नाही जागा
उरला
विठ्ठल दर्शनाने पंढरी, दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || ३ ||
1 comments
नमस्कार 🙏
ReplyDelete