फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार (FIRATYA CHAKA VARATI DESI MATILA AAKAR)
फिरत्या चाकावरती
देसी मातीला आकार
विठ्ठल तू वेडा कुंभार ... || धृ ||
माती पाणी उजेड वारा, तूच
मिसळशी सर्व पसारा
आभाळाच मग ये आकारा
तुझ्या घाटाच्या उतरंडीला
नसे अंत ना पार ... || १ ||
घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाच्या
दैव वेगळेतुझ्या विना हे कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते
लोणी कुणा मुखी अंगार ... || २ ||
तूच घडविशी तूच
फोडीशी कुरवाळसी तू तूच जोडीशी
न कळे यातून काय
सांधीशी
देसी डोळे परी
निर्मिसी तया पुढे अंधार ... || ३ ||
0 comments