विठू माऊली तू माऊली जगाची (VITHU MAVULI TU MAVULI JAGACHI)
विठू माऊली तू माऊली
जगाची
माऊलीच मूर्ती
विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||
काय तुझी माया सांगू
श्रीरंगा
संसाराची पंढरी तू
केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय
चंद्रभागा
अमृताची गोडी आज
आलीया अभंगा विठ्ठला
अभंगाला जोड टाळ चीपल्याची
माऊलीच मूर्ती
विठ्ठलाची ... || १ ||
लेकरांची सेवा केलीस
तू आई
आ आ आ लेकरांची सेवा
कस पांग फेडू आता कस
उतराई
तुझ्या उपकारा जगी
तोड नाही
ओवाळूनी जीव माझा
सावळे विठ्ठाई
जन्मभरी पूजा तुझ्या
पाउलाची
माऊलीच मूर्ती
विठ्ठलाची ... || २ ||
पांडुरंग पांडुरंग विठू
माउली तू
0 comments