अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग (ASHI CHIK MOTYACHI MAAL HOTI G TIS TOLYACHI G)
अशी चिक मोत्यांची
माळ होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपतीचा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग ... || धृ ||
ह्या चिक माळेला
रेशमी मऊ दार दोरा ग
मऊ रेशमांच्या
दोऱ्यात नारंगी माळ ओविल ग || १ ||
अशी चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची
माळ गणपतीला घातली ग || २ ||
मोरया गणपतीला फुलून
माळ शोभली ग
अशी चिक माळ पाहून, गणपती
किती हसला ग || ३ ||
त्याने गोड हसुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणरायाला ग
त्याच्या
आशीर्वादाने करू सुरुवात
शुभ कार्याला ग || ४
||
0 comments