टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग (TAAL BOLE CHIPALILA NAACH MAJHYA SANG)
टाळ बोले चिपळीला
नाच माझ्या संग
देवाजीच्या व्दारी
आज रंगला अभंग .... || धृ ||
दरबारी आले रंक आणि
राव
झाले एकरूप नाही
भेदभाव
गाऊ नाचू सारे या
हो, होऊनी नि:संग .... || १ ||
जन सेवेपायी काया
झिजवावी
घाव सोसुनिया मने
रिझवावी
ताल देऊनिया बोलतो
मृदुंग .... || २ ||
हरीभजनाचे सुख मी
लुटावे
गात गात माझे डोळे
मी मिटावे
नका करू कोणी माझ्या
समाधीचा भंग .... || ३ ||
ब्रह्मनंदि देह
बुडोनिया जाई
एक एक खांब वारकरी
होई
कैलासीचा राणा, झाला
पांडुरंग .... || ४ ||
0 comments