हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळा (HA DEVANCHA DEV GANAPATI SARVAHUNI VEGALA)
हा देवांचा देव गणपती
सर्वाहुनी वेगळा
वाहतो दुर्वाकुर
कोवळा..... || धृ ||
सिद्धी विनायक तू
हेरंबा, मंगल दायक तू आरंभ
चिंतामणी तू जय सुख
दाता, विषाल देही वैराग्याच्या
रंग तुझा सोवळा
...... || १ ||
पशाकुंश करी
विघ्नहरया, उभय करावी देशी अभया
अन्न ब्रम्ह परी
मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतो
चालतसे पांगळा .....
|| २ ||
गजमस्तक तू असीम
बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धी
साहित्याची अमृत
सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशा
ॐ कार गिरविला .... || ३ ||
1 comments
Who is the lyricist of this song?
ReplyDeleteHa devancha dev ganpati, sarva hun vegala