प्रथम तुला वंदितो कृपाळा (PRATHAM TULA VANDITO KRUPALA)
प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया || धृ ||
विघ्नविनाशक, गुणीजन पालक
दुरित तीमिर हार का, सुखकारक तू दु:ख विदारक
तूच तुझ्या सारखा, वक्रतुंड ब्रम्हांड नायका
विनायक प्रभुराया ..... || १ ||
सिद्धीविनायक तूच
अनंता
शिवात्मजा मंगला,
शेंदूर वदना विद्याधीशा
गणाधिपा वत्सला, तूच
ईश्वरा साह्य करावे,
हा भव सिंधू
तराया.... || २ ||
गजवदना तव रुप मनोहर
शुक्लांबर शिवसुता,
चिंतामणी तू अष्टविनायक,
सकळांची देवता
रिद्धी सिद्धीच्या वर दयाळा
देईकृपेची छाया....
|| ३ ||
0 comments