तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा (TUCH SUKH KARTA TUCH DUKH HARTA AVAGHYA DINACHYA NATHA)
तूच सुखकर्ता, तूच
दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा
बाप्पा मोरया रे,
बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ ||
पहा झाले पुरे एक
वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्ष
गोड अन्नाचा होतो रे
स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श
पुऱ्या वर्षाची
साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||
पहा आली कशी आज वेळ,
कसा खर्चाचा बसावा मेळ,
गुळ फुटणे खोबर नि
केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ,
करी भक्षण आणि
रक्षण, तूच पिता तूच माता... || २ ||
नाव काढू नको
तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या
घराचे, दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणून गोड
मानून घ्यावा आशीर्वाद आता..... || ३ ||
0 comments