सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (SUNDAR TE DHYAN UBHE VITHEVARI) 15:48 Unknown 0 Comments Category : अभंग , विठ्ठलाचे भजन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवूनिया || धृ || तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचि ध्यान || १ || मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित || २ || तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्री मुख आवडीने || ३ || Unknown RELATED POSTS 0 comments
0 comments