Harmony Clean Flat Responsive WordPress Blog Theme

हरी नाम जो जो विसरला, तया हसती लोक रे (HARI NAAM JO JO VISARALA, TAYA HASATI LOK RE)

15:48 Unknown 1 Comments Category :


हरी नाम जो जो विसरला, तया हसती लोक रे । कवडी मोल धन हे सारे, कमविले तु लाख रे ॥धृ॥


कुणाची ही शेतीवाडी, बंगलामाडी कुणाची । कुणाची ही मोटारगाडी, बॆलगाडी कोणाची ।
राहील सारे जाग्यावर, झाल्यावरती राख रे ॥१॥



माय-बापाला छळणारा पुत्र तो नसावा । मेल्यामागे तुप-रोटी देणारा नसावा ।
भुकेल्याची भुक जाण. लोभ सारा टाक रे ॥



थंडीमध्ये कुडकुडणारा देह पाहिला तु । झाकावया नाही गेला दुर राहिला तु ।
मायेचा उबारा दे तु, लाज त्याची राख रे ॥३॥



आज आहे उद्या नाही, क्षणिक ही काया रे । दत्त नामाविणा जाई, जन्म सारा वाया रे ।
श्रीधरा परी भक्तीची, गोडी जरा चाख रे ॥४॥

RELATED POSTS

1 comments

  1. Hi,this is really very nice blog.I have learned a lot of good and informative stuff from your

    blog.Thank you so much for sharing this wonderful post. Keep posting such valuable contents.

    Please visit our website by clicking the links given below.

    krishna bhajan song
    Bhojpuri Songs
    lokgeet song
    best hindi bhajan singer

    ReplyDelete